जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफने धाडसी कारवाई करत केरळमधील हाय-प्रोफाईल मोबाईल चोरीचा भंडाफोड केला आहे. मंगला एक्सप्रेसमधून १८ लाखांच्या मुद्देमालासह बिहारच्या चार सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे.

राहुल जायसवाल, मोहम्मद नसीम अन्सारी, रविकुमार साहनी आणि राधेश्याम यादव (सर्व रा. बिहार, सध्या गुरुग्राम दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत त्यांनी कन्नूर येथील मोबाइल दुकानातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात ३७ सुमारे १८.२५ लाख रुपयांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी केरळममधील कन्नूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अनुज यांनी भुसावळ मंडल नियंत्रण कक्षाला माहिती दिली की, मोबाइल चोरी प्रकरणातील चार संशयित आरोपी मंगला एक्स्प्रेसने (क्र. १२६१७) प्रवास करीत आहेत. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा दलाला माहिती देण्यात आली.
शुक्रवारी रात्री मंगला एक्स्प्रेस भुसावळात येताच सर्व डब्यात कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी जनरल कोचमध्ये चार संशयित प्रवासी आढळून आले.
फोटोद्वारे ओळख पटवून त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे नवीन मोबाइल फोन व रोकड आढळून आली.
यांनी केली कारवाई?
या कारवाईत उपनिरीक्षक सुदामा यादव, श्याम यादव, सीबीआय भुसावळचे आरक्षक कपिल कुमार तसेच इमरान खान, मेहेंद्र कुशवाह, योगेंद्र वानखेडे, विनोद कुमार, एस. एस. मीना यांच्यासह पथक सहभागी झाले होते. चारही संशयित सध्या भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात आहेत. त्यांना कन्नूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.










