विधानपरिषदेसाठी प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी मनपातील शिवसेना नगरसेवकांचा आग्रह

मे 23, 2026 1:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती कडून कुणाला लॉटरी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या जागेसाठी महायुतीकडून विविध नावांची चर्चा सुरू असतानाच, शिवसेनेकडून प्रतापराव गुलाबराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी आज त्यांची भेट घेतली.

pratapbhau

जळगाव महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज प्रतापराव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नगरसेवकांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तेच योग्य उमेदवार असल्याचे म्हटले. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रतापराव पाटील यांनी ही निवडणूक लढवावी, असा आग्रह या शिष्टमंडळाने केला.

प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होताच शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यांचा स्थानिक पातळीवरील दांडगा जनसंपर्क आणि संघटनात्मक पकड पाहता, त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत पक्षाची बाजू अधिक मजबूत होईल, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. उमेदवारीबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महायुतीचे हायकमांड काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now