Jalgaon : घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

एप्रिल 9, 2026 2:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच गणेशवाडी परिसरात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. या कारवाईत चोरट्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला असून पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे गुन्ह्याचा लवकरच पर्दाफाश झाला आहे.

kulbhushanpatil firing case arrest

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीब शेख ताजोद्दीन शेख (वय २३, रा. कासमवाडी) या रेकॉर्डवरील अट्टल चोरट्याने गणेशवाडी परिसरातील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चांदी व तांब्याच्या वस्तू असा एकूण सुमारे ५७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. उपनिरीक्षक चंद्रकांत धनके तसेच पोलीस कर्मचारी रामकृष्ण पाटील, नितीन ठाकूर, किरण पाटील आणि राहुल घेटे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेत त्याला अटक केली.

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. तसेच आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now