नोटिसीची मुदत संपली! अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानच्या अतिक्रमणांवर बुलडोझर फिरणार

एप्रिल 9, 2026 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. अजिंठा चौक ते कुसुंबा दरम्यान असलेल्या अतिक्रमणधारकांना दिलेल्या नोटिसीची मुदत संपली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत या भागातील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.

buld

या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (८ एप्रिल) अजिंठा चौक परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान महापौरांनी प्रशासनाला कडक निर्देश देत स्पष्ट केले की, अजिंठा चौक ते कुसुंबा हा रस्ता महापालिकेच्या हद्दीत येतो आणि या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. संबंधितांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आता नोटिसीची मुदत संपल्याने कोणत्याही क्षणी बुलडोझर चालवून अतिक्रमणे हटवली जातील.

याचवेळी महापौरांनी अजिंठा चौक ते कालिका माता मंदिर दरम्यान नव्याने उभ्या राहिलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवरही तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. रस्त्याच्या कामात किंवा रहदारीत अडथा ठरणारे कोणतेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे अजिंठा चौक परिसरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून, प्रशासन आता प्रत्यक्ष कारवाईसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now