जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२६ । आज, १ एप्रिल रोजी, नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात होत आहे आणि पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमती मोठी वाढल्या आहेत. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलो वजनाचा एलजीपी सिलिंडरच्या किंमतीमध्ये ३१० रूपयांची वाढ केली आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील जेवण महागण्याची चिन्हे आहेत

मध्यपूर्वेत इराण व अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.आधीच गॅस टचांईने त्रस्त नागरिकांना आता दरवाढीचा फटकाही बसणार आहे.

दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. याआधी ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. सध्या 14.2 किलोग्राम (घरगुती) सिलेंडरची किंमत 913 रुपये इतकी आहे.
नवीन दर काय?
इंडियन ऑइल (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी आज १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ३१० रुपयांची वाढ केली आहे. यानंतर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आता गॅस सिलिंडरची किंमत २,०३१ रूपये झाली आहे. तर राजधानी दिल्लीत या सिलिंडर २०७८.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये ₹२,२०८.०० तर चेन्नईमध्ये गॅस सिलिंडर ₹२,२४६.५० रूपयांना मिळणार आहे.











