जळगावात गावठी कट्टा विक्रीचा प्रयत्न उधळला; मुद्देमालासह दोघे जेरबंद

मार्च 31, 2026 12:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

gavthikatta

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर रोड परिसरात काही व्यक्ती कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नियोजन करून संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित इसम घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली असता त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे आढळून आली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मोटारसायकल आणि मोबाईल फोनसह एकूण सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेनंतर आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या शस्त्रांचा पुरवठा कुठून होत होता याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now