जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । इंग्रजांविरूध्द स्वातंत्र्याचा लढा सुरू असतांना फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. आता याच भूमित केंद्र सरकारच्या काळ्या कृषी कायद्यांचे दहन करण्यात आले. शेतकरी विरोधी कृषी कायदे करून केंद्र सरकार अन्यायच करत आहे. केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
यांची होती उपस्थिती
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जळगाव जिल्हा दौर्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषी कायद्यांच्या दहन आंदोलनासह मेळावा होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जळगाव जिल्हा दौर्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषी कायद्यांच्या दहन आंदोलनासह मेळावा होत आहे. यावेळी काँग्रेसच्या प्रदेशा कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
पंतप्रधान शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी तयार नाहीत
नाना पटोले म्हणाले, की फैजपुरात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. येथे ब्रिटीशांच्या विरूध्दचा लढा सुरू असतांना अधिवेशन घेण्यात आले होते. आता याच भूमित केंद्र सरकारच्या काळ्या कृषी कायद्यांचे दहन केले. हे तिन्ही कायदे शेतकर्यांच्या विरूध्द असून दिल्ली येथे सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू असतांनाही पंतप्रधान त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार नाहीत. अशा अत्याचारी पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे कायद्यांच्या मसुद्याचे दहन केले असल्याची माहिती पटोले यांनी सांगितले.
मोदी सरकारला धडा शिकवणार
देशात सरकार विरूध्द संतप्त भावना असून मोदी सरकारला २०२४ साली जनता धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी केला. तर, महागाईने सर्वसामान्य नागरिक हे त्रस्त झालेले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मार्च महिन्यात देशात सर्वत्र चिता पेटल्या असतांना पंतप्रधान हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारात लागले होते. सरकारच्या या दंडेलशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहोत.