महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले ; जळगावसह दोन ठिकाणी सर्वाधिक महाग, वाचा नवीन दर?

मार्च 26, 2026 11:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मध्यपूर्व देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता इंधन बाजारावरही दिसू लागला आहे. इंधनाची आयात कमी प्रमाणात होत असल्याने एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

petrol diesel

दरम्यान, तज्ज्ञांच्या मते जागतिक परिस्थितीमुळे इंधनाचा पुरवठा मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मात्र महाराष्ट्रात इंधनाचे दर स्थिर असले, तरी काही शहरांमध्ये दर तुलनेने जास्त असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव आणि परभणी या शहरांमध्ये राज्यातील सर्वाधिक पेट्रोल दर नोंदवला गेला आहे. जळगावमध्ये पेट्रोलचा दर १०५.५० रुपये प्रति लिटर असून डिझेल ९२.०३ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे परभणीमध्येही पेट्रोल १०५.५० रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर शंभर रुपयांच्या पुढे कायम आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे भाव काय तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर वाचा.

आजचे पेट्रोल डिझेलचे दर

जळगाव
पेट्रोल १०५.५० रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.०३ रुपये प्रति लिटर

परभणी
पेट्रोल १०५.५० रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.०३ रुपये प्रति लिटर

नाशिक
पेट्रोल १०४.७४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.२५ रुपये प्रति लिटर

मुंबई
पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर

पुणे
पेट्रोल १०४.१९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.७१ रुपये प्रति लिटर

ठाणे
पेट्रोल १०३.६४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.१६ रुपये प्रति लिटर

नागपूर
पेट्रोल १०४.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.५७ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर
पेट्रोल १०४.४९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.०४ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर
पेट्रोल १०४.८६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.३७ रुपये प्रति लिटर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now