युद्धाच्या छायेत वाहनधारकांना दिलासा ! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त..

मार्च 23, 2026 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. मध्य पूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव आणि अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम भारतीय इंधन दरांवर झाला आहे.

petrol diesel

आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ११२ डॉलरच्या पुढे गेली असून, अमेरिकन WTI क्रूडही १०० डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. काही आठवड्यांपूर्वीच हे दर ७० डॉलरच्या आसपास होते, त्यामुळे झालेली ही झपाट्याची वाढ चिंताजनक मानली जाते.

मात्र, या वाढीच्या पार्श्वभूमीवरही काही राज्यांमध्ये ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ७ पैसे आणि डिझेल ९ पैशांनी स्वस्त झाले असून, सध्या पेट्रोलचा दर सुमारे १०५.४३ रुपये तर डिझेल ९१.९४ रुपये आहे. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही इंधन दरात किरकोळ कपात करण्यात आली आहे.

एकूणच, जागतिक घडामोडींमुळे इंधन बाजार अस्थिर झाला असून, येत्या काही दिवसांत दरांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनधारकांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी इंधन खर्चाचे नियोजन करण्याची गरज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now