जळगावात अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले, गुन्हा दाखल

मार्च 20, 2026 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमध्ये वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून अशातच शहरात वाळूचे दोन वाहने पोलिसांनी पकडले आहे. वाळू तस्करांची हिंमत एवढी वाढली आहे, की जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या रस्त्यावर वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. तर कानळदा रस्त्यावर दुसरे ट्रॅक्टर पकडले. जिल्हापेठ व तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

valu 1

वाळू उपसा करण्यास बंदी असताना राजेरोसपणे शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरु आहे. रात्री अंधार पडल्यानंतर वाळू तस्करांना रान मोकळे होते. साडेनऊ वाजेपासून पिंप्राळा उड्डाण पुलावरून सर्वत्र वाळूचे डंपर, ट्रॅक्टर भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागतात. त्याचप्रमाणे पहाटे २ वाजेपासून ६ वाजेदरम्यान शहरातील ठिकठिकाणी सुरु असलेल्या गल्लीबोळातील बांधकामाच्या ठिकाणी ही वाहन अवैध वाळूचा पुरवठा करतात.

त्यामुळे नागरीकांना त्यांच्या आवाजाचा त्रास होतो. मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौक ते बसस्थानक दरम्यान एमएच १९ एएन ४४५८ (ट्रॉली क्रमांक एमएच १९ सीझेड २१७७) या ट्रॅक्टरमधून १ ब्रास वाळूची वाहतूक करताना गफुर बाबू तडवी (वय २६, रा. कुसुंबा) हा चालक पोलिस कॉन्नटेवल देवीदास पाटील यांना आढळून आला. हे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now