लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! फेब्रुवारी- मार्चचे 3000 रुपये ‘या’ तारखेपूर्वी खात्यात जमा होणार?

मार्च 16, 2026 1:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील लाखो महिलांना आधार देणारी लाडकी बहिण योजना सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिनादेखील अर्धा संपला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, महिलांच्या खात्यात फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ladki bahin

लाडकी बहीण योजनेत दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मागील थकबाकीची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर एप्रिल महिन्यापर्यंत पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.लाडकी बहीण योजनेत १५ एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. या महिन्यात निधी मंजूर झाल्यानंतर हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाईल.

महत्त्वाचे म्हणजे, अनेक महिलांचे केवायसी अपूर्ण किंवा चुकीचे असल्यामुळेही हप्ते थांबले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने सर्व लाभार्थींना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

जर महिलांनी वेळेत केवायसी पूर्ण केले तर डिसेंबरपासून मार्चपर्यंतचे चारही थकित हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे पात्र महिलांच्या खात्यात एकाचवेळी सुमारे 6000 रुपये जमा होऊ शकतात. म्हणूनच ज्या महिलांना अद्याप हप्ते मिळाले नाहीत त्यांनी तात्काळ केवायसी तपासून आवश्यक दुरुस्त्या करून घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now