जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२६ । सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. आज सोने दरात घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमती दणदणीत आपटल्या आहेत. मागचा आठवडाभर सोन्याच्या किंमती घसरल्या होत्या. त्यानंतर आता आता पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. Gold Silver Rate Today

आखाती देशांमधील (अमेरिका-इराण-इस्रायल) संघर्षामुळे जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम म्हणून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे, असं म्हणायलाही हरकत नाही. भविष्यात हे दर अजून घसरतील, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.

किती रुपयांनी घसरले सोन्याचे दर?
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४९० रुपयांनी घसरून १,५९,१७० रुपयांवर पोहोचले आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४५,९०० रुपये झाले आहेत. तसेच १८ कॅरेट सोन्याचे दर ३६० रुपयांनी घसरून १,१९,३८० रुपये झाले आहेत.
चांदीचे दर घसरले
आज चांदीच्या दरातदेखील घसरण झाली आहे. १ किलो चांदीमागे ५००० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर २,७०,००० रुपये झाले आहेत. १०० ग्रॅम चांदी ५०० रुपयांनी घसरली आहे.











