महाराष्ट्रावर अवकाळीचं मोठं संकट ! मेघगर्जनेसह वादळी पाऊस होणार, राज्य शासनाचा खबरदारीचा इशारा

मार्च 13, 2026 3:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२६ । महाराष्ट्रात एकीकडे सूर्य आग ओकत असून जळगावसह अनेक शहरातील तापमान चाळीशीच्या वर गेले आहे. यामुळे उष्णतेच्या झळांनी नागरिक होरपळून निघत आहे. मात्र अशातच हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर हवामान ढगाळ राहील. तसेच मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

rain

सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीच्या कामांचे नियोजन करावे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now