शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात महत्वाची माहिती

फेब्रुवारी 26, 2026 6:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२६ । विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्तेत असलेल्या महायुती सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. हे सरकार सत्तेत येऊन एक वर्षाच्या वर काळ लोटून गेला. पण अद्याप शेतकरी कर्जमाफी झालेली नाही. याच मुद्द्यावरून सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केलेल आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी महत्त्वाची माहिती दिली.

farmer 1

आज (26 फेब्रुवारी) राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, तसेच या कर्जमाफीसाठी सरकार काय-काय तयारी करत आहे, याबाबतही त्यांनी सांगितले आहे.

विधानसभेत बोलताना, मागच्या वर्षी शेतकऱ्यांवर जे संकट आलं त्यावेळी आपण शेतकऱ्यांना 15472 कोटी रुपयांची थेट मदत केली. हे पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पोहोचले. हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून दिलेले आहेत. शेतकरी जिथे अडचणीत आहेत, तिथे सरकार उभे आहे, असे अश्वासन फडणवीस यांनी दिले.

तसेच, कर्जमाफीबाबत बोलताना, आम्ही एक समिती तयार केलेली आहे. या समितीचा अहवाल अपेक्षित आहे. कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही जे आश्वासन दिलेले आहे ते आम्ही योग्य वेळी पूर्ण करणारच आहोत, असे फडणवीस म्हणाले. मागच्या अनेक कर्जमाफींमध्ये आम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. बँका चुकीच्या पद्धतीने खात्यांची माहिती देतात. जुने बँक खाते काढून सरकारकडून पैसे घेतात. ही फसवणूक रोखण्यासाठी शंभर टक्के अॅग्री स्टॅक तयार करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

आपण शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहोत. या रेकॉर्डमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, सातबाराचा अहवाल यांची यात नोंद असेल. हा डिजिटल रेकॉर्ड, आधार क्रमांक या सर्व गोष्टी एकत्रित ठेवून कर्जमाफीबाबत विचार केला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now