संघर्षमय प्रवास थांबला ! शिक्षणासाठी वेटरचं काम करणाऱ्या युवकाचं धक्कादायक पाऊल

फेब्रुवारी 21, 2026 4:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शिक्षण करण्यासाठी हॉटेलवर वेटर म्हणून कामाला असलेल्या तरुणाने राहत्या खोलीमध्ये जीवनयात्रा संपविली. प्रवीण तुलसीदास राठोड (वय १९, रा. आदर्श नगर) असं मयत तरुणाचं नाव असून तो बारावीचे पेपर देत होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

image 55 jpg webp

धानवड येथील रहिवासी असलेला प्रवीण राठोड हा तरुण जळगावात हॉटेलवर कामाला होता. वडील बारलेले असल्याने पुढील शिक्षणासाठी तो वेटरचे काम करीत होता. तो बारावीचे पेपर देत होता. हॉटेलमालकाच्या आदर्श नगरातील घरात भाडे तत्वावर सोबत काम करणार्या घेऊन या तरुणासह राहत होता. १९ रोजी रुममधील तरुण बाहेर गेलेले असताना प्रवीणने गळ#$ फास घेतला. काही वेळानंतर इतर तरुण घरी आले असता आतून दरवाजाला लावलेला होता.

त्यामुळे त्यांनी प्रवीणला कॉल केला; मात्र तो कॉल घेत नव्हता. त्यामुळे तरुणांनी गॅलरीतून उडी घेत घरात गेले असता प्रवीण गळ#$ फास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला जीएमसी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now