जळगाव लाईव्ह न्यूज । ‘बिग बॉस मराठी 6’ सध्या सर्वत्र पाहायला मिळत असून घरात या आठवड्यात मोठा वाद रंगला आहे. राखी सावंतने घराचा ताबा घेतल्यापासून घरात प्रचंड वादावादी, गोंधळ, भांडण होत असून आता एका घडलेल्या कृतीमुळे परिस्थिती आणखी चिघळली. भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला असून यात रितेश भाऊंनी राखीची बाजू घेत दुसरीकडे सचिन कुमावत यांना खडेबोल सुनावलं आहे.

नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपूर्वीच्या एपिसोडमध्ये राखी प्राजक्तासोबत प्लॅन करते. राखी प्राजक्ताला सांगते, मी तुला काम करायला सांगेन, पण तू माझं ऐकू नकोस. मग मी तुझ्या तोंडावर पीठ टाकेन. प्राजक्ता, राखीने सांगितल्याप्रमाणे करते. इतर कोणीही घरातील कामं करायला तयार नसतं म्हणून राखी हा प्लॅन करते. प्राजक्ताच्या तोंडावर राखीने पीठ टाकल्यामुळे सचिन आणि सागर राखीसोबत भांडायला जातात. सचिन, राखीला सुनावतो पण ती ऐकत नाही. राखीने पीठ टाकलं म्हणून सचिन राखीच्या तोंडावर पाणी आणि पीठ टाकतो. मात्र यांनतर सचिनला खूप वाईट वाटतं आणि तो राखीची माफीसुद्धा मागतो.

अशातच आता ‘कलर्स मराठी’ ने ‘बिग बॉस मराठी ६’चा भाऊंच्या धक्क्याचा नवा प्रोमो शेअर केला आहे. यात रितेश भाऊ राखीची बाजू घेताना आणि सचिनला ओरडताना दिसत आहे. ज्यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापले आहे. रितशे भाऊ राखीच्या चुकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोले जात आहे. कारण भांडणाची सुरूवात राखीने केली असते.
रितेश भाऊ नेमकं काय म्हणाले?
रितेश भाऊ – सचिन तुम्ही राखी यांच्या तोंडावर पाणी फेकलं, पीठ पण टाकलं… हे तुमचे नॅशनल रिॲक्शन होते…
सचिन कुमावत – ठरलेले नव्हते भाऊ…
रितेश भाऊ – तुम्ही एका महिलेच्या चेहऱ्यावरती पाणी कसे फेकू शकता? तुम्ही इथे सचिन भाऊ म्हणून वावरता ना? मग काय तुमचा आदर राहणार आहे? मला हे खूप खटकले…
बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी या आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. पाहा यादी-
सागर कारंडे
रुचिता जामदार
राकेश बापट
सचिन कुमावत
रोशन भजनकर
प्रभू शेळके
प्राजक्ता शुक्रे
दीपाली सय्यद
अनुश्री माने












