इकरा महाविद्यालयात योग दिवस साजरा

जून 21, 2021 4:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । इकरा शिक्षण संस्थेचे इकरा एच.जे. थीम महाविद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात कुराण पाढण करून काजी मुजम्मिल नदवी यांनी केली.

yoga day (1)

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सय्यद शुजाअत आली हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुनिल गुरव  व त्यांच्या   पत्नी अंजना मॅडम होत्या.प्रा डॉ. चांद खान यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेश भामरे यांनी केले. त्या नंतर सुनील गुरव यांनी योगा चे विविध आसन करून दाखवले.तसेच त्याचे फायदे काय हे समजून सांगितले. त्या नंतर प्राणायाम व हास्य योग करून मान किती प्रसन्न राहतो हे पटवून दिले.

या कार्यक्रमा प्रसंगी उप प्राचार्य पिंजारी, व युसुफ पटेल, डॉ.इरफान,डॉ. अमीन, डॉ.दापके,डॉ. फिरदौसी, प्रा. साजित मलक, डॉ. मुस्तकीम, डॉ.अख्तर शाह, डॉ. तन्वीर खान, प्रा.उमर खान, डॉ. वकार शेख, तसेच महिला मध्ये, डॉ.कुलकर्णी, प्रा.देवकर, डॉ. फिरदौस शेख, डॉ.शबाना, प्रा. काहेकशा इत्यादीची उपस्थिती होती.

कार्यक्रमा चा शेवटी डॉ.राजू गवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमा ला ऑनलाईन ची सुद्धा सुविधा करण्यात आली होती.त्याचा पुरे पुर फायदा विद्यार्थ्यांना मिळाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now