Pachora : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड; 6 जण ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त

फेब्रुवारी 18, 2026 4:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या वॉश आऊट मोहिमेअंतर्गत बहुळा नदीच्या काठावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले.

jugar

या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण १ लाख ५६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना पिंपळगाव हरेश्वर येथे बहुळा नदीच्या काठावर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून त्यांनी हवालदार अरुण राजपूत, भारत पाटील व योगेश भिलखेडे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री करून अचानक छापा टाकला असता सहा जण जुगार खेळतांना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now