जळगाव शहर मनपात गाळे प्रकरणी लवकरच स्वतंत्र अतिरिक्त आयुक्त येणार

जून 21, 2021 3:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । शहर मनपाचा गाळे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून मनपाच्या आर्थिक स्त्रोत विषय असलेल्या सर्व बाबींसाठी लवकरच स्वतंत्र व अतिरिक्त आयुक्त नेमण्यात येणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.

jalgaon manapa

शहरातील गाळे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. जळगाव शहर मनपातील नगररचना विभाग आणि मनपाच्या इतर आर्थिक स्त्रोत असलेल्या विषयातील सर्व बाबींसाठी स्वतंत्र अतिरिक्त आयुक्त नेमण्यात येणार आहे. 

सध्या आर्थिक स्रोत विषयाचे अधिकार मनपा आयुक्तांकडे असून अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केल्यावर हे अधिकार त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. शासनाच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी प्राप्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now