लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेला खात्यात 6000 रुपये जमा होणार?

फेब्रुवारी 13, 2026 4:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये थेट खात्यात दिले जात आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे चला जाणून घेऊया…

ladki bahin

अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करताना तांत्रिक चुका केल्या किंवा चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचा लाभ थांबला आहे. पूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीची योजना होती; मात्र आता ती रद्द करून ऑनलाइन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ज्या महिलांचा डिसेंबर 2025 पासून लाभ थांबला आहे, त्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळू शकतात. उदाहरणार्थ, 4 महिन्यांचे ₹1,500 प्रमाणे सुमारे ₹6,000 एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात. मात्र, यासाठी ई-केवायसी दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

अंतिम मुदत 31 मार्च 2026
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. ही मुदत यापूर्वी डिसेंबर 2025 पर्यंत होती. या तारखेनंतर दुरुस्तीची संधी मिळणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो.

अधिकृत पोर्टलवरच करा प्रक्रिया
लाभार्थी महिलांनी अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन ई-केवायसी स्थिती तपासावी. आधार लिंक, निवडलेले पर्याय आणि इतर माहिती अचूक असल्याची खात्री करून दुरुस्ती पूर्ण करावी. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कन्फर्मेशन जतन करणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now