सोन्याला उतरती कळा; सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, जाणून घ्या ताजे दर?

फेब्रुवारी 12, 2026 1:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२६ । सोनं आणि चांदीच्या दरात चढ-उताराचा खो-खो सुरूच आज पुन्हा सोन्याचा भाव घसरला आहे. जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचा डॉलर अधिक मजबूत झालाय. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झालाय. गुरूवारी सराफा बाजार उघडताच भारतामध्ये सोन्याचे दर घसरले. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १२०० रूपयांनी घसरल्याचे दिसतेय. मात्र दुसरीकडे चांदी दरात वाढ दिसून आलीय.

GS12Feb

goodreturns वेबसाईटच्या माहितीनुसार आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. आज सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,८४० रुपयांवर आला. तर २२ कॅरेटचे सोनं प्रति ग्रॅम ११० रूपयांनी स्वस्त होऊन १४,५२० रुपयांवर आलेय. तर १८ कॅरेटचे सोनं ११८८० रूपये प्रति ग्रॅम आहे. बुधवारच्या तुलनेत १८ कॅरेट सोन्याची किंमत ९० रूपयांनी स्वस्त झाली.

आज सोन्याचा दर घसरला असला तरी चांदी दरात वाढ झाली. चांदी ५००० रुपयांनी वाढून २,९५,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये चांदीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. २९ जानेवारी रोजी, इतिहासात पहिल्यांदाच चांदीचा भाव ४ लाख रुपयांच्या पुढे गेला आणि चांदीने ४,२०,०४८ रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला. मात्र एवढी, सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर, आता या धातूच्या दरात मोठी घसरण झाली.

चांदीप्रमाणेच, सोन्याच्या किमतीनेही २९ जानेवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठला. सोन्याचे दर १,९३,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचल्या होत्या. मात्र नंतर हा धातू खाली घसरत राहिला. उच्चांकापेक्षा सध्या सोने ३५ हजार रुपयांहून अधिकने आहे. मात्र अद्यापही सोने आणि चांदीचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now