डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘पायरेक्सीया २०२६’ चा थाटात शुभारंभ

जानेवारी 28, 2026 5:18 PM

केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते उद्घाटन ; पाच दिवस विविध स्पर्धा

Pyrexia 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिरथ बॅचतर्फे पायरेक्सीया २के२६ या क्रीडा स्पर्धांचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते थाटात शुभारंभ करण्यात आला. दि. २७ ते ३१ जानेवारी याकालावधीत व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, फुटबॉल, बॅडमींटन आणि फुटसल अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. वैभव पाटील वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, डॉक्टर उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now