जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२६ । रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ-बडनेरा रेल्वे विभागातील जलंब स्थानकावर डाउन लूप लाइन विस्तारासह इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे भुसावळ- बडनेरा मेमू, बडनेरा-नाशिकरोड विशेष एक्स्प्रेससह वर्धा -भुसावळ एक्स्प्रेस ३० जानेवारीला रद्द केल्या आहेत.

नाशिक रोड ते बडनेरा एक्स्प्रेस २९ रोजी रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अजमेर – पुरी व महाराष्ट्र एक्स्प्रेस २ तास उशिराने धावेल. या सर्वच रेल्वे गाड्या भुसावळ, जळगाव स्टेशनवर थांबा घेत असल्याने स्थानिक प्रवासी, अप-डाउन करणाऱ्या नोकरदारांसाठी महत्त्वाच्या आहेत.

या गाड्या आहेत रद्द
६११०९ भुसावळ-बडनेरा मेमू, .६११०२ बडनेरा-भुसावळ मेमू, गाडी क्र. १११२१ भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस, गाडी क्र. १११२२ वर्धा-भुसावळ एक्प्रेस, गाडी क्र. ०९२११ बडनेरा-नाशिकरोड विशेष ३० रोजी रद्द करण्यात आली असून, गाडी क्र. ०९२१२ नाशिकरोड-बडनेरा विशेष २९ जानेवारी रोजी रोजी रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गाडी क्र. २०८२४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस विभागात २.३० तास उशिरा धावणार असून, गाडी क्र.११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस विभागात २ तास उशिरा धावणार आहे.







