जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी काल झालेल्या मतदानानंतर आज निकाल जाहीर होत असून यामध्ये अख्या राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये भाजप-शिंदे गटाची सरशी होताना दिसू लागली.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने शतक पूर्ण केलं असून 106 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे 114 जागांची मॅजिक फिगर गाठून महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी त्यांना आता फक्त 06 जागांची गरज आहे. तर 20 वर्षांनी एकत्र आलेले राज व ठाकरे बंधू यांनीही युती करत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली खरी, पण ते केवळ 67 जागा मिळवू शकले आहेत.

एकंदरीत मनसे, म्हणजेच राज ठाकरे यांना एकत्र घेऊनही उद्धव ठाकरे यांना फारसा फायदा मिळाल्याचे दिसत नाहीये. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता आता भाजप-शिंदे गटाच्या हातात जाणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
हाती आलेल्या कलांनुसार, भारतीय जनता पक्ष 85, शिवसेना 21, मनसे 9, शिवसेना ठाकरे गट 58 जागांवर आघाडीवर अशी आकडेवारी समोर आली आहे. 80हून अधिक जागांमुळे भारतीय जनता पक्ष हा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप आणि शिंदे गटाने मिळून शकत गाठलं असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची युती हीच मुंबई पालिकेत सत्तेत असेल हेच हे आकडे दर्शवत आहेत.












