जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२६ । लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. मकरसंक्रातीआधीच पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून पैसे जमा झाले आहेत.

दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, याविरोधात काँग्रेसने निवडणुक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यावर निवडणुक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली करत लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, परंतु जानेवारी महिन्याचा लाभ आगाऊ स्वरुपात देण्यास मज्जाव केला आहे.

त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचे १५०० रूपयेच जमा होत आहे. त्यामुळे महिलांच्या मनात थोडी निराशा झाली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासूनच १५०० रुपये जमा झाले आहेत. सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत. उद्यापर्यंत सर्व महिलांना पैसे दिले जाणार आहेत.
पैसे आले की नाही असं करा चेक
लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये जमा झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल. याचसोबत तुम्ही ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊनदेखील पैसे आलेत की नाही चेक करु शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये माहिती मिळणार आहे. याचसोबत बँकेत जाऊनदेखील तुम्ही पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात.












