जिल्ह्यातील १५ जणांना पुरस्कार जाहीर : जळगावमध्ये लवकरच सन्मान वितरण सोहळा

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने सन २०२६ या वर्षासाठीचे जीवनगौरव पुरस्कार व दर्पणकार पुरस्कार अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी पुरस्कारांची घोषणा केली.
पत्रकारितेतील उल्लेखनीय, निष्ठावंत व समाजाभिमुख कार्याचा गौरव करण्यासाठी ६ जानेवारी – पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा या पुरस्कारांचे वितरण लवकरच जळगाव येथे आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

जीवनगौरव पुरस्कार
श्रीकांत सराफ – दिव्य मराठी
दीर्घकाळ पत्रकारितेत मोलाचे योगदान, मूल्याधिष्ठित लेखन आणि समाजजागृतीच्या कार्यासाठी श्रीकांत सराफ यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दर्पणकार पुरस्कार
पत्रकारांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दर्पणकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे—
1) सचिन जोशी – सकाळ
2) शशिकांत पाटील – पुण्यनगरी
3) गणेश सुरसे – सिनियर रिपोर्टर, दिव्य मराठी
4) दिपक महाले – तरुण भारत
5) प्रसाद धर्माधिकारी – लोकमत,
नशिराबाद प्रतिनिधी
6) गोपीचंद सोरडे, जेष्ठ पत्रकार
7) एम्तियाज अहमद – न्यूज १८ लोकमत
8) जुगल पाटील – जय महाराष्ट्र
9) शुभदा नेवे – ANI
10) रवी गोरे – TV9 मराठी
11) सोनम पाटील – जळगाव हेडलाईन्स
12) दिलीप पाटील – ट्रेंड लाईव्ह न्यूज, पाचोरा
13) जितेंद्र कोतवाल – लाईव्ह ट्रेंड
14) दिपक पवार, दिव्यमराठी, लोहारा
सत्य, निर्भीडता आणि लोकहित जपणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा उपक्रम असून, आगामी काळातही पत्रकारांच्या सन्मानासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातील असे संघटनेचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी सांगितले आहे.






