लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! डिसेंबर- जानेवारीचे 3000 रुपये एकत्र मिळणार? तारीख आली समोर

जानेवारी 5, 2026 11:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२५ । एकीकडे राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुका होत असून याच दरम्यान राज्य सरकारची महत्वकांक्षी असलेली लाडकी बहीण योजना चर्चेत आलीय. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला असून यानंतर आता महिला डिसेंबरच्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, अशातच आता जानेवारीचा हप्ता कधी दिला जाणार याबाबतदेखील चर्चा होत असताना डिसेंबर- जानेवारीचे दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

ladki bahin

डिसेंबर महिना उलटून गेला आता जानेवारीचाही पहिला आठवडा संपत आला. दरम्यान, अजूनही महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही. मागच्या आठड्यात नोव्हेंबरचे पैसे जमा केले. त्यानंतर आता डिसेंबर- जानेवारीचे ३००० रुपये महिलांना एकत्र मिळणार आहे. १४ जानेवारीपूर्वी हे पैसे जमा केले जातील. १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे तर १५ जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे. त्यापुर्वी महिलांना दोन हप्ते दिले जातील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सव्वाकोटी लाडक्या बहि‍णींना हप्ता मिळत आहे. या योजनेअंतर्गत दहा तारखेपर्यंत लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये मिळतील, असं शासन निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे महिलांना या महिन्यात लवकर पैसे येऊ शकता.

१० ते १४ तारखेपर्यंत पैसे दिले जातील
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता नुकताच दिली आहे. आता मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकदाच मिळेल. १० ते १४ जानेवारीपर्यंत पैसे दिले जातील, असं किरण जाधव, महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकाचवेळी दिला जाणार आहे. यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधीदेखील मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे महिलांना पुढच्या आठवड्यात पैसे येतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now