जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची चौथी जागा बिनविरोध झाली आहे. शहरातील प्रभागात १९ अ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे महापालिकेत महायुतीचा पाचवा तर शिवसेना शिंदे गटाचा चौथा उमेदवार बिनविरोध झाला आहे.

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी शेकडो उमेदवार रिंगणात उतरले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज २ जानेवारी रोजी शेवटची मुदत असून, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या माघारीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी आमने-सामने लढतीमधील तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने, शिवसेनेच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

यात प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यांनतर प्रभाग क्रमांक ९ अ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. तर प्रभाग 9 ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी माघार घेतल्याने प्रतिभा देशमुख या बिनविरोध झाल्या आहेत.
यानंतर आज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेची चौथी जागा बिनविरोध झाली आहे. प्रभाग १९ अ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेचे चार जागा तर महायुतीच्या पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये एक भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग १२ (ब) मधून बिनविरोध निवड आधीच झाली आहे











