सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा आमदार राजूमामा भोळेंच्या हस्ते भाजपात प्रवेश

डिसेंबर 26, 2025 8:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून अशातच सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर पाटील यांनी आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. जळगाव शहरातील जि.एम.फाऊंडेशन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

bhaskar patil

भास्कर पाटील यांनी आपल्या सेवाकाळात अनेक गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावत पोलीस दलाची प्रतिमा उंचावली. त्यांच्या कार्यामुळे जळगाव शहर व परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क निर्माण झाला असून सर्व समाजघटकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे नाते आहे.

दरम्यान, भास्कर पाटील आगामी निवडणुकीत ते थेट मैदानात उतरण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now