प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! भुसावळमार्गे अजमेर करिता स्पेशल ट्रेन.. जाणून घ्या थांबे अन् वेळापत्रक

डिसेंबर 16, 2025 5:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुससाठी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. दक्षिण मध्य रेल्वेने मच्छलीपट्टणम ते अजमेर दरम्यान विशेष ट्रेन सुरु केली असून या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. 07274 Machilipatnam Ajmer special train

train

‎मछलीपट्टणम–अजमेर (07274) ही विशेष रेल्वे रविवारी, २१ डिसेंबर रोजी मछलीपट्टणम येथून सकाळी १० वाजता सुटणार असून ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटाने भुसावळ स्थानकात दाखल होईल. यानंतर ती २३ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता अजमेर येथे पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी अजमेर–मछलीपट्टणम (07275) ही विशेष गाडी सोमवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता अजमेरहून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ५० मिनिटाने भुसावळ स्थानकावर येणार आहे. यानंतर तिसऱ्या दिवशी ३० डिसेंबर रोजी सकाळी ९. ३० मिनिटाने मछलीपट्टणमला पोहोचेल. 07275 Ajmer Machilipatnam Special Train

या स्थानकांवर असणार थांबा
गुडीवाडा, विजयवाडा, खम्मम, दोरनाकल, महबूबाबाद, वारंगल, जम्मीकुंटा, पेड्डापल्ली, करीमनगर, लिंगमपेट जगत्याल, मोर्तड, अरमुर, निजामाबाद, बसर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, मनवाथ रोड, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौडगड, भिलवाडा, बिजाईनगर आणि नशिराबाद या स्थानकांवर दोन्ही दिशेनं थांबणार.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now