लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेपर्यंत खात्यात ३००० रुपये जमा होणार?

डिसेंबर 13, 2025 10:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२५ । महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट आहे. नोव्हेंबर महिना उलटून आता डिसेंबरचे १३ दिवस गेले तरीही अजून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळाला नाही. अशातच येत्या ७ दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे ३००० रुपये जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.

ladki bahin

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे एकत्र येऊ शकतात. पुढच्या ७ दिवसात म्हणजे २१ डिसेंबरआधी पैसे देण्याची शक्यता आहे. २० डिसेंबर रोजी २० नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान आहे. यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे.

याअंतर्गत दर महिन्याला अनेक महिला अपात्र ठरतात. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. तसेच लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर हे काम करावे, असं आवाहन आदिती तटकरेंनी केलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now