TAIT परीक्षेच्या 2207 उमेदवारांचा निकाल रद्द ; कारण आले समोर

डिसेंबर 12, 2025 6:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 संदर्भात महत्त्वाची कारवाई करत व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे नियोजित मुदतीत सादर न केलेल्या 2207 उमेदवारांचा निकाल रद्द करण्यात आला आहे.

examinations for medical

TAIT परीक्षा 27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत आयबीपीएसमार्फत ऑनलाइन पद्धतीने राज्यातील 60 केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी 2,28,808 नोंदणी तर 2,11,308 उमेदवार उपस्थित होते. निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता.

B.Ed. व D.El.Ed. appear म्हणून अर्ज केलेल्या उमेदवारांना व्यावसायिक अर्हतेची गुणपत्रके उत्तीर्ण झाल्यानंतर कमाल एक महिन्यात परिषदेकडे सादर करणे बंधनकारक होते. परिषदेकडून 15 सप्टेंबर आणि नंतर 25 सप्टेंबरपर्यंत मुदत देऊनही 2207 उमेदवारांनी कागदपत्रे मुदतीत सादर केली नाहीत. त्यामुळे त्यांचा निकाल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या उमेदवारांची यादी परिषदेतर्फे www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून या संदर्भातील कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now