बसमध्ये चढताना प्रवाशाच्या खिशातून पैसे लांबविणारे तिघे पाकीटमार पोलिसांच्या जाळ्यात

डिसेंबर 10, 2025 4:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यात गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढताना मंगळसूत्र, मोबाईल, पैसे चोरी होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच अजिंठा चौफुलीवर बसमध्ये चढताना प्रवाशाच्या खिशातील १५ हजार रुपये काढणाऱ्या तीन पाकीटमारांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

Three arrested f

हमीद अय्युब खान, समीर खान अफसर खान आणि शोहेब मेहमूद पटेल रा. रजा कॉलनी परिसर असं चोरट्यांनी नावे असून तिघा आरोपींकडून संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावलचे शेख कलीम शेख इसाक हे सोमवार (दि.1) रोजी पत्नीच्या उपचारांसाठी जळगावात आले होते. काम झाल्यावर ते बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पैसे चोरले. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीद्वारे तपास सुरू केला.

रजा कॉलनी परिसरातील हमीद अय्युब खान, समीर खान अफसर खान आणि शोहेब मेहमूद पटेल यांचा या चोरीत सहभाग असल्याचे उघड झाले. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली असून गिरीष पाटील हे पुढील तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now