महाराष्ट्रातील 16 एक्सप्रेस गाड्या आता LHB डब्यांनी धावणार ; या गाड्यांचा समावेश?

नोव्हेंबर 17, 2025 6:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेने प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी राज्यातील १६ गाड्यांमधील सध्याच्या पारंपारिक डब्यांच्या जागी नवीन LHB डबे कायमस्वरूपी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. LHB बोगी बसवल्यास ट्रेनचा स्पीड आणखी वाढण्याची शक्यता आहे.

LHB

LHB कोच (लिंके हॉफमॅन बुश) हे जर्मनीमध्ये डिझाइन केलेले असून त्याची निर्मिती भारतात होत आहे. LHB कोचेस हे आधुनिक, स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आले आहे. यामध्ये अँटी-क्लाइंबिंग उपकरणे आणि अग्निरोधक साहित्य यासारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. सध्या असणाऱ्या आयसीएफ डब्यांच्या तुलनेत LHB डब्यांचा वेग जास्त आहे. आयसीएफ डब्यांचा वेग १४० KM प्रतितास इतका आहे. तर LHB डब्यांचा वेग १६० किमी प्रतितास आहे. हा वेग भविष्यात २०० किमीपर्यंत वाढवता येणार आहे.

या एक्सप्रेसमध्ये LHB कोच –

सीएसएमटी-चेन्नई
पुणे-भगत की कोठी एक्सप्रेस
पुणे-अहमदाबाद
कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन
हजरत निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेस
अहमदाबाद – पुणे एक्सप्रेस
भगत की कोठी – पुणे एक्सप्रेस

चेन्नई – सीएसएमटी एक्सप्रेस
कोल्हापूर – अहमदाबाद एक्सप्रेस
वेरावळ – पुणे एक्सप्रेस
कोल्हापूर – नागपूर एक्सप्रेस
भुज – पुणे एक्सप्रेस
पुणे – भूज एक्सप्रेस
नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस
अहमदाबाद – कोल्हापूर एक्सप्रेस
पुणे – वेरावल एक्सप्रेस

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now