जळगावात रेल्वेखाली आल्यानं तरुणाचा मृत्यू ; घातपाताची चर्चा

नोव्हेंबर 17, 2025 5:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । धावत्या रेल्वेखाली आल्यानं जळगावच्या तानाजी मालुसरे नगरातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून मृत्यूपूर्वी त्याचा काही तरुणांशी वाद झाल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे घातपाताबाबत चर्चा आहे.हर्षल प्रदीप भावसार असं मृत तरुणाचं नाव आहे.

train crime jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील असोदा रस्त्यावर असलेल्या तानाजी मालुसरे नगरातील हर्षल भावसार हा मजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील असा परिवार आहे.

रेल्वे स्टेशन अधिकारी राजेश पालरेचा यांच्या म्हणण्यानुसार, रविवार (दि.16) रोजी मध्यरात्री सुमारे 12 वाजता मालगाडीच्या लोको पायलटने खांबा क्रमांक 433/14 अ ते 433/16 अ दरम्यान एका व्यक्तीचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या घटनेची नोंद रात्री दोनच्या सुमारास करण्यात आली.

तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे आणि हवालदार प्रकाश चिंचोरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. हर्षलचा मृत्यूपूर्वी काही तरुणांशी वाद झाल्याचे सांगितले जात असून, त्यावरून घातपाताची शक्यता चर्चेत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now