जळगाव लाईव्ह न्यूज । मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर कडक जरब बसवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मुक्ताईनगर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामोहिमेत गुन्ह्यातील दोन फरार आरोपींसह एकूण १५ संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली

मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी, लालगोटा आणि हलखेडा या गावांमध्ये हे कोंबिंग ऑपरेशन यशस्वीपणे राबवले. या मोठ्या कारवाईत एका पोलीस निरीक्षकासह चार सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, १३० पोलीस अंमलदार आणि आर.सी.पी. पथकांनी सहभाग घेतला. या संयुक्त कारवाईदरम्यान, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी कमलेश्वर ज्ञानेश्वर पाटील (वय ४५, रा. मधापुरी) आणि दिपमाला कमलेश पाटील (वय ३८, रा. मधापुरी)या दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली. व रेकॉर्डवर’ असलेल्या १३ जणांवर प्रतिबंधक कारवाई

अटकेच्या कारवाईसोबतच, पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि पूर्वी चोरी/दरोड्यासारख्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या १३ इसमांवर प्रतिबंधक कारवाईची (भा. ना. सु. संहिता कलम १२८ व १२९) कठोर कार्यवाही केली आहे. यामध्ये मधापुरी येथील ६, लालगोटा येथील ६ आणि हलखेडा येथील १ अशा एकूण १३ जणांचा समावेश आहे.
प्रतिबंधक कारवाई केलेल्यांमध्ये मुख्यतः पवार आणि भोसले समाजातील व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांचे वास्तव्य मधापुरी, लालगोटा आणि हलखेडा या तीन गावांमध्ये आहे. जिल्हा पोलीस दलाची ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध होती. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्यासह विविध उपविभाग आणि पोलीस मुख्यालयाकडील ०१ पोलीस निरीक्षक, ०४ सहायक/उपनिरीक्षक आणि १३० पोलीस अंमलदार असे मोठे मनुष्यबळ वापरण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने ०४ आर.सी.पी. पथके देखील सहभागी होती.












