लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर ! आजपासून ऑक्टोबरचे 1500 रुपये बँक खात्यात येणार

नोव्हेंबर 4, 2025 10:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२५ । महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये आजपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली असून १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

ladki bahin

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाली होती. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ऑक्टोबर संपून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली. मात्र ऑक्टोबरचा हप्ता खात्यावर कधी जमा होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाडक्या बहि‍णींमध्ये उत्सुकता होती.

अखेर, ही प्रतिक्षा संपली आहे. राज्यातील सर्व लाडक्य बहि‍णींच्या खात्यावर आजपासून १५०० रूपये वितरीत केले जाणार आहे. आदिती तटकरेंनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. तसेच मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई केवायसीबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now