SEBI मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 110 पदांसाठी भरती, पगार 35000

ऑक्टोबर 31, 2025 2:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार SEBI च्या अधिकृत वेबसाइट sebi.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करावा.

sebi

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (General)56
2असिस्टंट मॅनेजर (Legal)20
3असिस्टंट मॅनेजर (IT)22
4असिस्टंट मॅनेजर (Research)04
5असिस्टंट मॅनेजर (Official Language)03
6असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)02
7असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering)03
Total110

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1.: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
पद क्र.2.: विधी पदवी (LLB).
पद क्र.3.: कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)
पद क्र.4.: पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)
पद क्र.5.: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
पद क्र.6.: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.7.: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
सेबीमधील या नोकरीसाठी निवड स्टेज १ परीक्षा, स्टेज २ परीक्षा आणि इंटर्व्ह्यूद्वारे होणार आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी बोलवले जाईल. यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. स्टेज १ परीक्षा १० जानेवारी २०२६ तर स्टेज २ परीक्षा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाईल.

किती अर्ज शुल्क लागेल?
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे.
वेतनश्रेणी : या नोकरीसाठी उमेदवारांना बेसिक सॅलरी ३५,४०० रुपये मिळेल. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now