तुळशी विवाहानंतर लग्नाचे बार उडणार! यंदाच्या शुभ मुहूर्ताच्या तारखा पहा..

ऑक्टोबर 30, 2025 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२५ । दिवाळीची लगबग संपली असून आता तुळशी विवाहानंतर लग्नाचे सनईचौघडे वाजणार आहेत. तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नाचा बार उडणार असून अगदी पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत लग्नाचा मौसम चालणार आहे

married jpg webp

कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. त्यानुसार २ ते ५ नोव्हेंबरपर्यंतच तुळशी विवाह असणार आहे. त्यानंतरच चातुर्मास-मध्ये थांबलेली लग्नसराई होते. एरवी तुलसी विवाहानंतर लगेच सुरू होणारी लग्नसराई १५ दिवसांनंतर सुरू होणार आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू झालेली लग्नसराई पुढे फक्त ५ डिसेंबरपर्यंत चालेल. शुक्राचा अस्त १४ डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत आहे. त्या दरम्यान मुहूर्त नाहीत. यंदा नोव्हेंबर 2025 ते जुलै २०२६ या दरम्यान विवाहासाठी ५५ दिवस असणार आहे.

यावर्षी विवाहयोगासाठी ग्रह फारसे अनुकूल नसण्याचे मुख्य कारण म्हणजे गुरूचा अस्त आणि शुक्राचा अस्त हे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या अस्ताच्या काळात विवाह करणे शुभ मानले जात नाही.

विवाहाचे शुभमुहूर्त :

नोव्हेंबर २०२५ : २२, २३, २५, २६, २७, ३०
डिसेंबर २०२५ : २, ५
जानेवारी २०२६ : २०. २३. २४. २५. २६
फेब्रुवारी २०२६ : ३, ५, ६, ७, ८, ११, १२, २०, २२, २५, २६
मार्च २०२६ : ५, ७, ८. १२, १४, १५, १६ तर २१
एप्रिल २०२६ : २१, २६, २८, २९, ३०
मे २०२६ : १, ३, ६, ८, ९, १०, १३, १४
जून २०२६ : १९, २३, २४, २७
जुलै २०२६ : १, ३, ४, ७, ८, ११

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now