जळगावच्या कारागृहात गँगवॉर ; कैद्याला गंभीर दुखापत करत जीवे मारण्याची धमकी

ऑक्टोबर 30, 2025 2:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा कारागृहात कारागृहात गँगवॉर झाल्याची घटना घडली. ज्यात बॅरेक २ मध्ये झोपलेल्या बंदीला चौघांनी शिवीगाळ करत टणक वस्तूने डोक्यावर वार करत गंभीर दुखापत केली. तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) असं जखमी बंदीचे नाव असून त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी चार बंदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon district jail

नेमका प्रकार काय?

जळगाव जिल्हा कारागृहात बंदी असलेला तेजस सोनवणे हा बॅरेक २ मध्ये झोपलेला असताना, याच कारागृहातील चार बंदींनी त्याला घेरले. आरोपी बंदींमध्ये पराग रविंद्र आरखे, बबलू उर्फ विशाल राजू गागले, भूषण विजय माळी उर्फ भाचा आणि सचिन कैलास चव्हाण यांचा समावेश होता. या चौघांनी तेजसला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर चौघांनी तेजसला शिवीगाळ करत, त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस काहीतरी टणक वस्तूने वार करून गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे, तर त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

हा सर्व प्रकार सुरू असतानाच, कर्तव्यावर असलेल्या जेल शिपायांनी धाव घेऊन मध्यस्थी केली आणि भांडण सोडवले. या मारहाणीत जखमी झालेल्या तेजस सोनवणे याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या गंभीर घटनेनंतर रात्री ९.३० वाजता जखमी तेजस सोनवणे याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी पराग आरखे, बबलू गागले, भूषण माळी उर्फ भाचा आणि सचिन चव्हाण या चार बंदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now