लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी 410 कोटीचा निधी वितरीत करण्यास मंजुरी

ऑक्टोबर 30, 2025 1:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२५ । राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योज योजनेत ऑक्टोबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. हा महिना संपायला अवघे दोन दिवस उरले आहे तरीही काही अपडेट समोर आलेली नाही. अशातच ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता देण्यासाठी ४१०.३० कोटी इतका निधी वितरीत करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहे.

ladki bahin yojan

दरम्यान, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता असून यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळेच लाडकी बहीण योजनेत महिलांना ३००० रुपये एकत्र येऊ शकतो. लाडकीचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे येऊ शकतो.

‘लाडकी बहीण’साठी शासनाने ३९६० कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत. यातून ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी सदर निधी वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेला हा निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी आणि विभाग प्रमुखांनी काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही.

मासिक अहवाल सादर करणे अनिवार्य
वितरित निधीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत आयुक्त, समाजकल्याण आणि इतर संबंधित विभागांना पाठवणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now