ना दिवाळी, ना भाऊबीजेला..; लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? नवी अपडेट आली..

ऑक्टोबर 25, 2025 11:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२५ । राज्य सरकारकडून राबविलेल्या जात असलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रूपये दिले जात आहे. यापूर्वी अनेकदा सणीसुदीच्या मुहूर्तावर सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरीत केले आहे. सप्टेंबरचा हप्ता काही दिवसापूर्वी महिलांच्या खात्यात जमा झाला. ऑक्टोबरचा हप्ता भाऊबीजेला तरी १५०० रुपये खात्यात जमा होतील अशी अपेक्षा होती, पण तेही जमा झाले नाहीत. आता ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे.

ladki bahin

याच दरम्यान आता ऑक्टोबरच्या हप्ताबाबत मोठी अपडेट समोर आलीय. येत्या काही दिवसात ऑक्टोबरचे पैसे जमा केले जाणार आहे. ऑक्टोबर महिना संपत आला आहे. महिनाअखेरला फक्त ८ दिवस उरले आहेत. दरम्यान, या ८ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर गेला होता. सप्टेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्यात आले होते. त्यामुळे हा हप्तादेखील लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी येत्या ८ दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लवकरच याबाबत माहिती दिली जाईल.

लाडकीच्या केवायसीला ब्रेक

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सध्या लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला ब्रेक लावण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुका होईपर्यंत केवायसी तुर्तास बंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now