हातावर सुसाईड नोट लिहत महिला डॉक्टरनं संपविले जीवन

ऑक्टोबर 24, 2025 11:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्म@#हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले.

New Project 1 2

त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकाराने फलटण तसेच संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉ. मुंडे या फलटण (जि. सातारा) येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून त्या पोलीस विभाग आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्याविरूद्ध चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन.” तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.

अखेर काल (गुरुवारी) रात्री महिला डॉक्टरने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या हातावर आढळलेल्या लिखाणामुळे आत्महत्येचे प्रकरण आता गुन्हेगारी चौकशीच्या टप्प्यावर गेले आहे. महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्ये लिहिली होती. या मजकुरात त्यांनी नमूद केले आहे की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला.” या धक्कादायक खुलाशानंतर पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now