जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२५ । एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु असताना यातच खान्देशातील धुळे येथे काँग्रेसला खिंडार पडले आहे. माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून यामळे धुळ्यात शिंदे सेनेची ताकद वाढली आहे.

सध्या राज्यातील प्रत्येक नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक नेत्यांनी रणशिंग फुंकले आहेत. अनेक तालुक्यांमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच धुळ्याच्या साक्रित काँग्रेसला खिंडार पडलं आहे.

पश्चिम पट्ट्यातील काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. विकासकामांसाठी पक्षप्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या पक्षप्रवेशानंतर साक्रीत शिंदे सेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झालीये.
तर, काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्ष सोडल्याने पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. धुळ्यात काँग्रेसची ताकद कमी झाल्यामुळे पक्षातील मोठ्या नेत्यांना धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.












