भीषण ! मुंबईहून भुसावळकडे येणाऱ्या ट्रेनमधून तीन जण फेकले गेले, दोघे ठार, एक गंभीर

ऑक्टोबर 19, 2025 11:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२५ । दिवाळी आणि छठ पूजा निमित्त मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणाहून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. मात्र याचदरम्यान दिवाळीसाठी घरी जाताना तीन प्रवाशी धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची घटना नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वेमध्ये एकच खळबळ उडाली.

train

या घटनेबाबत असे की, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून रकसोल (बिहार) कडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे युवक खाली पडल्याची भीषण दुर्घटना शनिवारी नाशिक स्टेशनजवळ रात्री घडली. शनिवार रात्री नाशिकरोड रेल्वे स्थानकावर न थांबता कर्मभूमी एक्सप्रेस गाडी पुढे गेली. त्यानंतर ओढा रेल्वे स्थानकावरील स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिकरोड रेल्वे विभागाशी संपर्क साधून कळवले की, गाडी सुटल्यानंतर काही वेळात जेल रोड हनुमान मंदिरजवळील ढिकले नगर परिसरात तिघे युवक रेल्वेखाली पडल्याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलिस हवालदार भोळे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भुसावळकडे जाणाऱ्या पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 दरम्यान 30 ते 35 वयोगटातील दोन युवक मृतावस्थेत आढळले. तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गाडीतून पडून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार निवडणुकीसाठी मतदानासाठी जात होते, याबाबतही तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now