मुक्ताईनगर तहसीलमधील अव्वल कारकूनचा सर्रास पैसे घेतानाचा VIDEO व्हायरल

ऑक्टोबर 17, 2025 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात शासकीय अधिकऱ्यासह कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेचे प्रमाणात सातत्याने समोर येत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचं आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे.

karkunmt

ज्यात मुक्ताईनगर तहसील कार्यालयामधील अव्वल कारकून कैलास पाटील यांचा योजनेच्या कामासाठी लावणाऱ्या कागदपत्रांच्या शपथपत्रांवर सही-शिक्क्यासाठी लाभार्थी महिलेकडून रोख रक्कम स्वीकारताना व्हिडिओ व्हायरल झाला. गोरगरिबांकडून पैसे उकळण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांपासून तहसील कार्यालयात शासकीय कामांसाठी, विशेषतः ‘शपथपत्र’ तयार करण्यासाठी आणि त्यावर शिक्का-सही मिळवण्यासाठी नागरिकांकडून अनधिकृतपणे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने भ्रष्टाचार बोकाळला होता. अखेर एका जागरूक नागरिकाने या गैरप्रकाराचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. त्याने आवश्यक कागदपत्रांसाठी कारकून कैलास पाटील यांना पैसे देतानाचा संपूर्ण व्यवहार आपल्या कॅमेऱ्यात चित्रीत केला.

विशेष नायब तहसीलदार यांचा टेबल शेजारी असतानाही, त्यांच्या लक्षात हा प्रकार का येत नाही, असा प्रश्न निर्माण होतो आहे या गंभीर प्रकरणावर स्थानिक तहसीलदार गिरीष वखारे यांच्या कडून माहीती घेतली असता. त्यांनी सांगितले की, तहसील कार्यालयाचे कर्मचारी कैलास पाटील यांच्याबद्दलची व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप मी बघितली या व्हिडिओ क्लिप ची पूर्णपणे खात्री करून पुढील निर्णय घेऊ असे प्रसारमाध्यमा समोर बोलताना सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now