खासगी बसच्या धडकेत दोघे भाऊ गंभीर जखमी ; जळगावातील घटना

ऑक्टोबर 15, 2025 1:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२५ । जळगावातून अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात मार्गावर दुचाकी दुरूस्ती करत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बसने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ गंभीररित्या जखमी झाले. ही घटना जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खोटे नगर जवळील राधीका हॉटेल जवळ घडली असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, गणपत भिकन कुंभार (वय ३५) आणि त्यांचा लहान भाऊ अर्जुन कुंभार, दोघेही निमखेडी येथील रहिवासी असून, मंगळवारी रात्री ते दुचाकीने खोटेनगरच्या दिशेने जात होते. दरम्यान, हॉटेल राधिकाजवळ दुचाकीची चैन उतरली होती. आणि अचानक त्यांची दुचाकी रस्त्यावर जागेवरच थांबली. तेवढ्यात त्यांच्या मागून येणारी खासगी लक्झरी बस क्रमांक (एमएच १९ सीवाय ८२२२) ने दोन्ही भावांना धडक दिली.

या भीषण अपघातात गणपत आणि अर्जून हे दोन्ही भाऊ जखमी झाले. यातील गणपती यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. तर अर्जून यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर लक्झरी हे तालुका पोलीसात जमा करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now