शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! महाराष्ट्रात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा, कुठे यलो अलर्ट?

ऑक्टोबर 15, 2025 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२५ । एकीकडे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना राज्यात परतीचा पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान खात्यानं राज्यात आजपासून 17 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMDने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात राज्यभरातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी फिरेल.

Rain

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची तीव्रता कमी झाली आहे. असे असले तराही पुढच्या काही दिवसात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज बहुतांश भागात पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. तळकोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आले आहेत.

रायगड, ठाणे भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नगर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. तर उद्या (16 ऑक्टोबर) बहुतांश राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.

16 ऑक्टोबर -रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे . तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . मुंबई ,ठाणे ,पालघर भागात पावसाची शक्यता आहे .

17 ऑक्टोबर – पालघर, नाशिक, जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .मराठवाडा मध्य महाराष्ट्र व तळ कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now