Jalgaon : लव जिहादचा संशय.. तरुणाला मारहाण करत दुचाकी पेटविली, 10 जण पोलिसांच्या ताब्यात

ऑक्टोबर 11, 2025 4:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२५ । लव जिहादच्या संशयावरून काही तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील मोहाडी रोडवर घडली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत पोलिसांनी ८ ते १० तरुणांना ताब्यात घेतले आहे.

bikefire

काय आहे घटना?

भुसावळ तालुक्यातील तरुण आणि तरुणी हे दोघे आज शनिवारी दुपारी जळगाव शहरात आले असता ते मोहाडीरोड परिसरात एका दुकानावर थांबले, त्यावेळी काही तरुणांनी दोघांची विचारपूस केली. त्यावर दुचाकीवरील तरुणाने अर्वाच्च भाषेचा वापर केला. दरम्यान हा लव जिहादचा संशय आल्याने संतप्त उपस्थित तरुणांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर येथील तरुणांनी या तरुणाची दुचाकी पेटवून दिली, त्यामुळे दुचाकी जळून खाक झाली आहे. जखमी झालेल्या तरुणावर प्राथमिक उपचार देण्यात आले. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी या प्रकारात ८ ते १० तरुणांना ताब्यात घेतले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now