लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपली! सप्टेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून खात्यात जमा होणार

ऑक्टोबर 10, 2025 10:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महायुतीच्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ही योजना सुरु झाल्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र, ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये. अशातच लाडक्या बहिणींची सप्टेंबर 2025 च्या हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे.

ladki bahin

सप्टेंबरच्या हप्त्याबाबबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे. आजपासून ते दोन दिवसांत राज्यातील पात्र लाडकीच्या खात्यात सन्मान निधी वर्ग केला जाईल, असे तटकरेंनी सांगितलेय.

लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याचे १५०० रूपये येणार, याबाबत माहिती अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. दिवाळीच्या तोंडावर लाडकीच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांची दिवाळी होड होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now